Kieron Pollard  
क्रीडा

मुंबई इंडियन्सच्या 'या' खेळाडूने दिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

Published by : left

देशात आयपीएलचा फिव्हर सूरू आहे, त्यात आता एका मुंबई इंडियन्सच्या एका खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा दिला आहे. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डने (Kieron Pollard) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. पोलार्ड आयपीएलमध्ये खेळत राहणार आहे.

वेस्ट विंडिजचा अष्टपैलू खेळाडू आणि मर्यादित षटकाचा कर्णधार कायरन पोलार्ड (Kieron Pollard) याने बुधवारी अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. मागील 15 वर्षांपासून पोलार्ड (Kieron Pollard) वेस्ट विडिंज संघाचा सदस्य आहे. सध्या पोलार्ड भारतामध्ये सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत व्यस्त आहे. पोलार्ड आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व करतोय.

कारकिर्द

पोलार्डने वेस्ट विंडिजसाठी 123 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये 2706 धावा आणि 55 विकेट घेतल्या आहे. पोलार्डला जगातील सर्वोत्कृष्ट टी 20 खेळाडू म्हणून ओळखलं जाते. आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये पोलार्डने 101 सामन्यात 135.14 च्या स्ट्राइक रेटने 1568 धावा चोपल्या आहेत. पोलार्डने अखेरचा आंतरारष्ट्रीय टी 20 सामना फेब्रुवारी 2022 मध्ये बारताविरोधात खेळला आहे. यामध्ये पोलार्डने वेस्ट विडिंजच्या संघाचं नेतृत्व केले होते.

पोलार्डने 587 टी 20 सामन्यात 11 509 धावा चोपल्या आहेत. सर्वाधिक टी 20 धावा चोपणाऱ्या खेळाडूंमध्ये पोलार्ड तिसऱ्या क्रमांकावर आहे. पोलार्डने जगातील अनेक टी 20 लीगमध्ये प्रतिनिधित्व केले आहे.

IPS Sanjay Pandey: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वाल हा भारतीय संघाचा सुपरस्टार; पहिल्या 10 कसोटींमध्ये केला हा विक्रम

IND vs BAN 1st Test: पहिल्या दिवसाचा खेळ अश्विन आणि जडेजाच्या नावावर

Devendra Fadnavis: लाडकी बहिण योजनेच्या निधीविषयी मोठी अपडेट! देवेंद्र फडणवीस म्हणाले...

One Nation One Electionवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने - सामने