क्रीडा

चंद्राला कवेत घेतलं आता विश्वचषक...; चांद्रयान-3च्या यशानंतर मुंबई इंडियन्सचं खास ट्विट

भारताची चांद्रयान मोहिम यशस्वी झाली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

प्रणव ढमाले

भारताची चांद्रयान मोहिम यशस्वी झाली आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरले आहे. काल (23 ऑगस्ट ) संध्याकाळी 06 वाजून 04 मिनिटांनी चांद्रयानने दक्षिण ध्रुवाला स्पर्श केला आहे. यासोबतच भारताने इतिहास रचला. त्यानंतर सर्वत्र आनंद साजरा केला जातोय. त्याचप्रमाणे क्रिकेटपटूंनी देखील शास्त्रज्ञांचं कौतुक केलं आहे. सध्या भारतीय क्रिकेटचा एक संघ आयर्लंडच्या दौऱ्यावर आहे. त्यावेळी भारतीय संघाने चांद्रयान 3 च्या लँडिंगचं थेट प्रक्षेपण पाहिलं. याचा व्हिडिओ देखील बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केला. त्याचप्रमाणे आता आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असणाऱ्या मुंबई इंडियन्सने ट्विटर अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे.

2019 साली भारतानं आखलेली चांद्रयान 2 ही मोहीम अगदी अंतिम टप्प्यात असताना अयशस्वी ठरली होती. त्याचप्रमाणे 2019 साली भारतानं वर्ल्डकप गमावला होता. आता यंदा भारतानं चांद्रयान 3 मोहीम यशस्वी करत चंद्राला कवेत घेतलंय. त्याचप्रमाणे कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात यावर्षी होणारा विश्वचषक भारत कवेत घेऊ शकतो असे संकेत या ट्विटच्या माध्यमातून दिले आहेत.

मुंबई इंडियन्सच्या या ट्विटने सध्या सोशल मिडीयावर धुमाकूळ घातलाय. या ट्विटमध्ये एका बाजूने 2019 साली इस्रोचे शास्त्रज्ञ के सिवन हे हताश झाल्याचा आणि त्या खाली चांद्रयान 3 च्या यशस्वीतेचा फोटो शेअर केलाय. तर, दुसरीकडे 2019 साली वर्ल्डकप हरल्यानंतर रोहित शर्मा हताश झाल्याचा फोटो शेअर करत शेवटी 2023 साली वर्ल्डकप कवेत घेण्याची संधी असल्याचे थेट संकेत दिलेत. यामुळे आता यंदा भारत विश्वचषकात बाजी मारत आणखी एक नवा विक्रम रचू शकतो.

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news