मुंबई आणि विदर्भ यांच्यात झालेल्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या संघानं अखेर बाजी मारली. वानखेडे मैदानात खेळवलेल्या अंतिम सामन्यात मुंबईने कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात विदर्भला १६९ धावांनी पराभूत केलं. मुंबईने दिलेल्या ५३८ धावांचं लक्ष्य गाठताना विदर्भाच्या फलंदाजांची पुरती दमछाक झाली. विदर्भचा संघ दुसऱ्या डावात ४१८ धावांवर गारद झाला. ४२ वेळा रणजी ट्रॉफी किताब जिंकण्याचा विक्रम मुंबईच्या नावावर नोंदवण्यात आला आहे. तर विदर्भाचा तिसऱ्यांदा हा किताब जिंकण्याचं स्वप्न तुटलं. मुंबईने ८ वर्षानंतर रणजी ट्रॉफीत घवघवीत यश मिळवलं आहे. २०१५-१६ च्या हंगामात सौराष्ट्रचा पराभव करून मुंबईने विजयाची मोहोर उमटवली होती.
वाडकरचा शतकी खेळीचा झंझावात
अंतिम सामन्यात ५३८ धावांचा पाठलाग करताना विदर्भाने १३३ धावांवर ४ विकेट्स गमावले होते. त्यानंतर करुण नायर आणि कर्णधार अक्षय वाडकर यांच्यात पाचव्या विकेटसाठी ९० धावांची भागिदारी झाली. मुशीर खाने नायरला बाद करून या भागिदारीला तोडलं. नायर बाद झाल्यानंतर अक्षय वाडकर आणि हर्ष दुबे यांनी सहाव्या विकेटसाठी १३० धावांची भागिदारी केली. या भागिदारीमुळं विदर्भाच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. दुसऱ्या डावात मुंबईने भेदक मारा केल्यानं विदर्भाचा दुसरा डाव ३६८ धावांवर सर्वबाद झाला. वाडकरने १०२ आणि हर्ष दुबेनं ६५ धावा केल्या. तनुष कोटियानने मुंबईसाठी ४ आणि मुशीर खानने दोन विकेट घेतल्या.
रणजी ट्रॉफीचे मागील पाच विजेता संघ
मुंबई - ४२
कर्नाटक - ८
दिल्ली - ७
मध्यप्रदेश - ५
बडोदा - ५
सौराष्ट्र - २
विदर्भ - २
बंगाल - २
तामिळनाडू - २
राजस्थान - २
महाराष्ट्र - २
हैदराबाद - २
रेल्वे - २