तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 157 धावांचे आव्हान ठेवले आहे. विराट कोहलीच्या 77 आणि ऋषभ पंतच्या 25 धावांच्या खेलीवर भारत हि धावसंख्या गाठू शकला.
टॉस जिंकून इंग्लंडनं गोलंदाजीचा निर्णय घेतला.भारताची सुरुवात काहीशी खराब झाली.. के. एल. राहुल आणि रोहित शर्मा स्वस्तात माघारी गेल्यानंतर विराट कोहलीवर सगळी मदार आली. भारताने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 156 धावा केल्या. टीम इंडियाकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक नाबाद 77 धावांची खेळी केली. तसेच हार्दिक पांड्याने 17 धावा करत विराटला चांगली साथ दिली. तर रिषभ पंतने 25 धावा केल्या. इंग्लंडकडून मार्क वुडने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
इंग्लंडच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. इंग्लंडकडून जेसन रॉय आणि जॉस बटलर सलामी जोडी मैदानात खेळत आहेत. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 157 धावांचे आव्हान दिले आहे. त्यामुळे हि धावसंख्या इंग्लंड पूर्ण करते का हे पहावे लागणार आहे.