क्रीडा

स्मृती मानधना ते दीपिका पल्लीकल: CWG 2022 मध्ये भाग घेणारे सर्वात सुंदर खेळाडू

इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन होणार आहे. 72 देशांचे पाच हजारांहून अधिक खेळाडू यात सहभागी होत आहेत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे (CWG) उद्घाटन होणार आहे. 72 देशांचे पाच हजारांहून अधिक खेळाडू यात सहभागी होत आहेत. 20 वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांचा त्यामध्ये समावेश आसणार आहे. भारताचे 210 पुरुष आणि महिला खेळाडू 16 वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेत आहेत. हॉकीपटू मनप्रीत आणि बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हे भारताचे फ्लॅग बिअरर आहेत. 8 ऑगस्टपर्यंत या स्पर्धा चालू राहतील.

तालिक्वा क्लॅन्सी (Taliqua Clancy) ऑस्ट्रेलियाच्या बीच व्हॉलीबॉल महिला संघाचे नेतृत्व करणार आहे. ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करणारी ती पहिली ऑस्ट्रेलियन व्हॉलीबॉल खेळाडू असेल.

सलामीवीर स्मृती मानधना (Smriti Mandhana) ही भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आहे. भारताचा CWG 2022 मध्ये ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि बार्बाडोस यांच्याशी मुकाबला होणार आहे.

दीपिका पल्लीकल (Dipika Pallikal) बर्मिंगहॅम CWG 2022 मध्ये एकेरी खेळात सुवर्णपदक जिंकण्याचा मानस केला आहे. दीपिकाने यापूर्वीच CWG मध्ये दोन रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले आहे.

तातजाना शोनमेकर (Tatjana Schoenmaker) ही दक्षिण आफ्रिकेची जलतरणपटू आहे. तिने 200 मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. आणि 2020 ऑलिम्पिक खेळांमध्ये 100-मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये रौप्य पदकही जिंकले.

बॉक्सर टीना रहीमी (Tina Rahimi) CWG 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करत आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत ऑस्ट्रेलियासाठी बॉक्सिंग करणारी ती पहिली मुस्लिम महिला ठरणार आहे.

बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (P.V. Sindhu) CWG 2022 च्या उद्घाटन समारंभासाठी भारताचे फ्लॅग बिअरर म्हणून सहभागी होणार आहे.

एला कोनोली (Ella Connolly) ऑस्ट्रेलियन स्पर्धक असून ती CWG 2022 मध्ये रिलेमध्ये भाग घेईल.

कॅटरिना मेरी जॉन्सन थॉम्पसन (Katarina Mary Johnson-Thompson) युनायटेड किंगडमची आहे. ती इंग्लिश हेप्टाथलीट आहे.

सारा ग्लेन (Sarah Glenn) ही इंग्लंडची असून इंग्लंड क्रिकेट संघाचा भाग आहे.

ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू एलिस पेरी (Ellyse Perry) पहिल्यांदाच कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये खेळणार आहे. महिला क्रिकेटमध्ये बर्मिंगहॅममधून ती पदार्पण करणार आहे.

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव

Lokshahi Marathi Live Update : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर राहावं-मंत्री उदय सामंत

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे