आयसीसीच्या ताज्या वनडे क्रमवारीत मिताली पुन्हा एकदा फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचली. त्यामुळे मितालीने ICCच्या वनडे क्रमवारीत आपलाच राज कायम ठेवला आहे. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत शानदार कामगिरी करण्याचा फायदा झाला आहे.
आपल्या २२ वर्षांच्या कारकीर्दीत ती आठ वेळा वनडे क्रमवारीत पहिली आली. महिला क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या मितालीने इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २०६ धावा केल्या. ती या मालिकेत सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली.या कामगिरीच्या जोरावर तिने फलंदाजांच्या क्रमवारीत चार स्थानांची झेप घेतली.
२००५मध्ये मिताली पहिल्यांदा फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान झाली होती. सध्याच्या क्रमवारीत मितालीशिवाय स्मृती मंधाना अव्वल-१० फलंदाजांमध्ये आहे.