Ziva Dhoni Team Lokshahi
क्रीडा

धोनीच्या लेकीचा सिक्रेट सांता बनला मेस्सी; दिले खास गिफ्ट

भारतीय क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनीची पत्नी साक्षी धोनीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.

Published by : shamal ghanekar

कतार येथे झालेल्या विश्वचषक फायनलमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ पराभव केला. तब्बल ३६ वर्षांनंतर त्याला विश्वचषक जिंकता आला आहे. 1978 आणि 1986 नंतर त्याने आता तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. त्यानंतर भारतामध्येही अनेक फुटबॉलप्रेमींनी अर्जेंटिनाच्या विजयाचा जल्लोष केला. भारतीय क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनीची पत्नी साक्षी धोनीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. साक्षी धोनीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये महेंद्र सिंह धोनी आणि त्याची मुलगी झिवा (Ziva Dhoni) हे अर्जेंटिनाच्या जर्सीमध्ये दिसत आहे. 

ख्रिअमस निमित्त लियोनेल मेस्सीने साइन केलेली जर्सी झिवाला गिफ्ट दिली आहे. ही जर्सी घातलेला फोटो साक्षीनं शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघेही अर्जेंटिनाची जर्सीमध्ये दिसत आहे. हे फोटो झिवाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. झिवाच्या या फोटोंना नेटकऱ्यांनी हजारो लाईक्स आणि कमेंट केली आहेत. झिवाचे 1.9 मिलियन फॉलोवर्स आहेत.

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news