भारताचा सुप्रसिद्ध क्रिकेटर सचिन तेंडूलकर यांनी भारतीय संघात प्रवेश केला. सुरवातीला सगळ काही चांगले होते नंतर हळूहळू कांबळी हे क्रिकेट पासून दूर जात गेले. आता विनोद कांबळीची आर्थिक स्थिती सध्या चांगली नाहीय. त्याने अलीकडेच एका मुलाखतीत सध्या त्याच्याकडे काम नसल्याचं सांगितले होते. सध्या ते फक्त दर महिन्याला BCCI कडून मिळणाऱ्या पेन्शनचा आधारे कुटुंब चालवत असल्याचे त्यांनी सांगितले. विनोद कांबळी आता 50 वर्षांचा आहे. 2019 मध्ये त्याने टी 20 मुंबई लीग स्पर्धेत शेवटचा कोचिंगचा जॉब केला होता. कोरोनामुळे तर त्यांची परिस्थिती आणखीच बिकट झाली. मुलाखतीनंतर विनोद कांबळी यांची सर्वत्र चर्चा होऊ लागली. परंतु आता विनोद कांबळीची ही अडचण लक्षात घेऊन, आता महाराष्ट्रातील एक उद्योगपती मदतीसाठी पुढे आले आहेत. संदीप थोरात असं त्यांच नाव आहे. उद्योजक संदीप थोरात यांनी माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला नोकरीची ऑफर दिली आहे. मुंबईतल्या सह्याद्री उद्योगसमूहाच्या फायनान्स कंपनीत एक लाख रुपये पगाराची ऑफर त्यांनी दिली आहे.
काय म्हणाले ते उद्दोजक ?
संदीप थोरात यांनी या नोकरीसाठी पगार किती असेल, हे सुद्धा सांगितले आहे. विशेष म्हणजे विनोद कांबळीवर ओढावलेल्या स्थितीबद्दल बोलताना थोरात यांनी दिवंगत समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचाही उल्लेख केला आहे. माझ्या फायनान्स कंपनीच्या मुंबईमध्ये १० ब्रँच होत आहेत. विनोद कांबळी हे फायनान्समधील नसले तरी क्रिकेट हा असा विषय आहे की, त्यात मायक्रो मॅनेजमेंट चालते. याच मायक्रो मॅनेजमेंटचा वापर या ब्रँचच्या व्यवस्थापनासाठी करता येईल. क्रिकेटमध्ये ज्या शिस्तीने काम चालते तीच शिस्त ते या कंपनीमध्ये लावू शकतात, असे मला वाटते. म्हणून मी त्यांना एक लाख रुपये पगाराची ऑफर मुंबईमध्ये करणार आहे, असे थोरात यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की,“महाराष्ट्रात खूप चांगले व्यक्ती आहेत, मात्र त्यांच्यावर ही वेळ का येते? हेच कळलं नाही, विनोद कांबळी यांनी क्रिकेट मध्ये भारताचे नाव एका विशिष्ट उंचीवर नेऊन पोहोचवलं. मात्र आज कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी ओढाताण करावे लागत असेल हे आपलं अपयश आहे” यावेळी बोलतांना उद्दोजक थोरात असे म्हणाले.
काय म्हणाले कांबळी सचिन बद्दल ?
माध्यमांचा सचिन तेंडूलकर यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता या प्रश्नावर कांबळी म्हणाला की, “सचिनला सगळं काही माहित आहे. पण मला त्याच्याकडून कुठलीही अपेक्षा नाही. त्याने मला तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकादामी काम दिलं होतं. त्याचा मला आनंद आहे. तो चांगला मित्र आहे. माझ्या पाठिशी तो नेहमीच उभा आहे”