क्रीडा

Shooting Competition : विश्वचषक नेमबाजी स्पर्धा : मैराज खानला मिळालं ऐतिहासिक सुवर्णपदक

मैराज अहमद खानने ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी (Shooting Competition ) स्पर्धेतील पुरुषांच्या स्कीट प्रकारात सोमवारी ऐतिहासिक कामगिरी करताना भारताला पहिले सुवर्णपदक (Gold Medal) मिळवून दिले.

Published by : Siddhi Naringrekar

मैराज खान (Mairaj Khan) खानने ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी (Shooting Competition ) स्पर्धेतील पुरुषांच्या स्कीट प्रकारात सोमवारी ऐतिहासिक कामगिरी करताना भारताला पहिले सुवर्णपदक (Gold Medal) मिळवून दिले. मैराजने रिओ येथे २०१६ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते. दुसरीकडे अंजुम मुदगिल, आशी चौक्सी आणि सिप्ट कौर सामरा या भारतीय त्रिकुटाने महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स सांघिक गटात कांस्यपदक पटकावले.

४० फैऱ्यांच्या अंतिम फेरीत ४६ वर्षीय उत्तर प्रदेशच्या मैराजने ३७ गुणांसह अग्रस्थान पटकावले. कोरियाच्या मिन्सू किम (३६ गुण) आणि ब्रिटनच्या बेन लेवेलिन (२६ गुण) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदकाची कमाई केली. दोन ऑलिम्पिक स्पर्धामध्ये सहभाग नोंदवलेला मैराज सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात भारताचा सर्वात वरिष्ठ खेळाडू आहे.

भारतीय नेमबाजांनी ऑस्ट्रियाच्या शेलीन वैबेल, नादीन उन्गराक आणि रेबेका कोएक यांना १६-६ अशा फरकाने पराभूत केले.

मुंबईत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 19 ते 21 नोव्हेंबरला रात्री विशेष लोकल

काँग्रेसच्या नेत्यांच्या आज महाराष्ट्रात सभांचा धडाका

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर

नोमानींच्या व्हिडिओवर आशिष शेलारांची सडकून टीका, फडणवीसांनीही भरसभेत ऐकवली ऑडिओ क्लिप

Latest Marathi News Updates live: आदित्य ठाकरे यांचा मुंबई मेट्रोतून प्रवास