Maharashtra's first victory in badminton team lokshahi
क्रीडा

बॅडमिंटनमध्ये महाराष्ट्राला पहिल्या विजयाचे दर्शन

दर्शन पुजारीने सुरूवातीपासून आक्रमक खेळी केली

Published by : Shubham Tate

बॅडमिंटनच्या मुलांच्या पहिल्या सामन्यात महाराष्ट्राला विजयाचे दर्शन घडले. दर्शन पुजारी याने तामीळनाडूच्या थांगम कविन याचा दोन सेटमध्ये पराभव केला. उद्या त्याचा सामना उत्तराखंडच्या प्रणव शर्मासोबत होणार आहे. ताऊ देवीलाल स्पोर्टस (Sports) कॉम्प्लेक्समधील सुसज्ज बॅडमिंटन (Badminton) हॉलमध्ये हे सामने सुरू आहेत. स्पर्धेचा आज दुसरा दिवस होता. (Maharashtra's first victory in badminton)

दर्शन पुजारीने (मुंबई) सुरूवातीपासून आक्रमक खेळ केला. थांगम त्याचा अंदाज घेत होता. परंतु लगेच महाराष्ट्राच्या दर्शनने दोन गुण घेत चांगली सुरूवात केली. नंतर ही आघाडी त्याने वाढवत नेली. थांगमला त्याने डोके वर काढू दिले नाही. दर्शनने पहिला सेट (21 विरूद्ध 10) जिंकून सामन्यात आघाडी घेतली. फोरहँड आणि बॅकहँड हे दोन्ही फटके तो लीलया मारत होता. खास करून त्याने स्मॅश जास्त मारले.

पहिला सामना हरलेला थांगम दबावाखालीच खेळत होता. त्यामुळे गुणफलक 19 विरूद्ध 7 असा झाला. काही चुकीचे फटके मारल्याने थांगमला गुण मिळाले. परंतु सरळ सेटमध्ये दर्शनने त्याचा पराभव केला. दोन्ही सेट त्याने 21 विरूद्ध 10 आणि 21 विरूद्ध 10 अशा फरकाने जिंकले.

हैदराबादला सराव

मुंबईचा रहिवासी असलेला दर्शन पुजारी हा हैदराबाद येथील पुलेला गोपीचंद यांच्या अकादमीमध्ये सराव करतो. त्याच्याकडून महाराष्ट्राला पदकाची अपेक्षा आहे. सामन्यानंतर त्याने तसा निश्चय बोलून दाखवला.

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Lokshahi Marathi Live Update : महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे यांना जळगाव जिल्ह्यात विक्रमी मतदान

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...