kuldeep yadav team lokshahi
क्रीडा

‘कुलदीप यादव इज बॅक’ तीन विकेट घेत बजावली महत्त्वाची भूमिका

या संधीचे सुवर्णसंधीत रूपांतर करण्याचा या खेळाडूंनी पुरेपूर प्रयत्न केला

Published by : Shubham Tate

kuldeep yadav : वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने 88 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारतीय फिरकी गोलंदाजी जोडीने चमकदार कामगिरी करत वेस्ट इंडिजवर सहज विजयाची नोंद केली. क्रिकेटच्या इतिहासात असे प्रथमच घडले आहे जेव्हा टी-20 सामन्यातील सर्व विकेट स्पिनरने घेतल्या आहेत. (kuldeep yadav won the hearts of fans with a spectacular comebackplayed an important role three wickets)

या सामन्यात भारतीय संघात अनेक बदल पाहायला मिळाले आणि अनेक खेळाडूंचे पुनरागमन झाले. श्रेयस अय्यर, इशान किशन, कुलदीप यादव, रवी बिश्नोई आदी खेळाडूंना या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. या संधीचे सुवर्णसंधीत रूपांतर करण्याचा या खेळाडूंनी पुरेपूर प्रयत्न केला.

श्रेयस अय्यरने सलामी देताना अर्धशतक झळकावले, तर रवी बिश्नोई आणि कुलदीप यादवने फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवून विकेट घेतल्या. युवा रवी बिश्नोईने केवळ 2.4 षटकांत केवळ 16 धावांत 4 बळी घेतले, तर अनुभवी कुलदीप यादवने 4 षटकांत अवघ्या 12 धावांत 3 बळी घेत प्रदीर्घ काळानंतर शानदार पुनरागमन केले.

या स्पेलमध्ये कुलदीप यादवनेही मेडन ओव्हर टाकली. प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करताना कुलदीप यादवने अशी दमदार कामगिरी करून चाहत्यांची मने जिंकली. सोशल मीडियावर चाहत्यांनी कुलदीप यादवचे कौतुकही केले. अशात येत्या सामन्यांमध्ये कुलदीप यादवला भारतीय संघात संधी मिळणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कुलदीप यादव आणि रवी बिश्नोई यांच्याशिवाय अक्षर पटेलनेही चमकदार कामगिरी केली. अक्षर पटेलनेही 3 षटकात केवळ 15 धावा देत 3 बळी घेतले. त्याने एक विकेटही घेतली. अशा स्थितीत आज आशिया चषकासाठी जाहीर होणाऱ्या भारतीय संघात कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार आणि कोणाला नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...