आगामी होणाऱ्या टी-२० विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना पाहण्याची जगभरातील क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. क्रिकेटच्या मैदानात भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना रंगला की, तमाम प्रेक्षकांच्या भुवया उंचावतात. इतकच नव्हे तर या महामुकाबल्याचे तिकिटाचे दर पाहूनही अनेकांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. टी-२० विश्वचषकाचा भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला ९ जूनला न्यूयॉर्कमध्ये रंगणार आहे. पण या सामन्याचे तिकीट दर गगनाला भिडले असल्याची माहिती समोर आलीय.
अधिकृत विक्रीमध्ये तिकीटाची खरी किंमत डॉलर ६ म्हणजेच ४९७ रुपये इतकी होती. ज्यामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात प्रिमियम सीट्ससाठी सर्वात महागड्या तिकीटाची किंमत डॉलर ४०० म्हणजेच ३३१४८ रुपये इतकी होती. तसंच या तिकीटाला करही आकारण्यात आला नव्हता. पण स्टबहब आणि सीटगीक सारख्या प्लॅटफॉर्मवर किमती खूप असतात. ४०० डॉलर एव्हढी या तिकीटांची किंमत होती. या तिकिट्स रिसेल मार्केट साईटवर ४० हजार डॉलर (जवळपास ३३ लाख रुपये) उपलब्ध आहेत. यामध्ये अतिरिक्त शुल्क जोडले तर ५० हजार डॉलर (जवळपास ४१ लाख रुपये) पर्यंत पोहोचते.
यूएसए टुडेच्या रिपोर्टनुसार, सुपर बाउल ५८ चं सरासरी तिकीट दुय्यम बाजारात ९ हजार डॉलरमध्ये विक्री झालं. तर एनबीए फायनलसाठी कोर्टसाईट सीट्सची किंमत २४ हजार डॉलर इतकी होती. सीटगीक प्लॅटफॉर्मवर तिकिटांचे दर वाढले आहेत. कारण टी-२० विश्वकप २०२४ मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी सर्वात महागड्या तिकिटाची किंमत १७५००० डॉलर (जवळपास १.४ कोटी रुपये) लिस्ट केलं होतं. यामध्ये प्लॅटफॉर्म शुल्क आणि अतिरिक्त शुल्क वाढवलं तर, हा आकडा जवळपास १.८६ कोटी रुपयापर्यंत पोहोचतो.