Sachin Tendulkar  Google
क्रीडा

सचिन तेंडुलकरनं विराट-धोनीला टाकलं मागे! अलिशान बंगला अन् महागड्या कारची क्रेझ, किती आहे नेटवर्थ?

सचिन कमाईच्या शर्यतीतही सर्वात पुढे आहे. सचिनने नेट वर्थमध्ये विराट कोहली आणि एम एस धोनीलाही मागं टाकलं आहे.

Published by : Naresh Shende

Sachin Tendulkar Net worth: क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने १६ वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. सचिनने २४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. सचिनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यापासून एक दशकाचा कालावधी उलटला आहे. तरीही सचिनतच्या नावावर असलेले अनेक विक्रम मोडू शकले नाहीत. सचिन कमाईच्या शर्यतीतही सर्वात पुढे आहे. सचिनने नेट वर्थमध्ये विराट कोहली आणि एम एस धोनीलाही मागं टाकलं आहे.

किती कोटींचा मालक आहे सचिन तेंडुलकर?

सचिन तेंडुलकरने २०१३ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतरही सचिनच्या कमाईच्या ग्राफमध्ये घसरणा झाली नाही. ५१ वर्षांचा सचिन आजही मोठी कमाई करत आहे. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर्सच्या यादीत सचिन तेंडुलकरचं नाव अव्वल स्थानावर आहे. रिपोर्टनुसार, सचिनचं २०२३ पर्यंतचं एकूण नेटवर्थ जवळपास १७५ मिलियन डॉलर म्हणजेच १४३६ कोटी इतकं होतं. सचिनचं महिन्याचं उत्पन्न ४ कोटी, तर वर्षाचं उत्पन्न ५५ कोटींहून अधिक आहे. सचिन कोकाकोला, एडिडास, बीएमडब्लू इंडिया, तोशिबा, जिलेटसह अनेक कंपन्यांसोबत करार झाला आहे. सचिनचा क्लोथिंग बिझनेसही आहे.

अलिशान बंगला आणि महागड्या कारचा मालक

मुंबई आणि केरळमध्ये सचिनचा अलिशान बंगला आहे. मुंबईच्या वांद्रे येथे असणाऱ्या बंगल्याची किंमत जवळपास १०० कोटी रुपये असल्याचं बोललं जात आहे. २००७ मध्ये सचिननं ४० कोटी रुपयांचं घर खरेदी केलं होतं. वांद्रे-कुर्ला येथे सचिनचा अलिशान फ्लॅटही आहे. तसच मुंबईत आणि बंगलोरमध्ये सचिनचे दोन अलिशान फ्लॅटही आहेत. सचिनच्या महागड्या कारचंही मोठं कलेक्शन आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये एकाहून एक जबरदस्त महागड्या कारचा समावेश आहे. रिपोर्टनुसार, सचिनकडे फरारी ३६० मोडेन, बीएमडब्ल्यू ७ सीरिज, बीएमडब्ल्यू आय ८, निसान जीटी-आर, ऑडी क्यू ७, बीएमडब्ल्यू एम ६ ग्रेन कूप, बीएमडब्ल्यू एम5-30 जेरे आणि ७५० एलआयएम स्पोर्ट्स कार आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी