IND VS WI | Team India | KL Rahul team lokshahi
क्रीडा

IND VS WI : टीम इंडियाचा हा दिग्गज खेळाडू 3 टी20 मॅंचपासून बाहेर, आता खेळणार...

टी20 मालिकेसाठी टीम इंडियात आहेत हे खेळाडू

Published by : Shubham Tate

KL Rahul : टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुल आयपीएल 2022 पासून क्रिकेटपासून दूर आहे. इंग्लंड दौऱ्यापूर्वी केएल राहुलला दुखापत झाल्याने त्याला शस्त्रक्रियेसाठी जर्मनीला जावे लागले. त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी कोरोना झाला आणि आता असे मानले जात आहे की तो पहिल्या तीन टी-20 सामन्यांमध्ये खेळणार नाही. (kl rahul set to miss first 3 t20i vs west indies ind vs wi series)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, केएल राहुल पहिल्या तीन वनडेत खेळणार नाही. वेस्ट इंडिजविरुद्धची टी-20 मालिका २९ जुलैपासून सुरू होत आहे. पहिले तीन T20 त्रिनिदाद आणि नंतर सेंट किट्समध्ये खेळवले जातील. या मालिकेतील शेवटचे दोन टी-20 सामने अमेरिकेतील लॉडरहिल येथे होणार आहेत.

केएल राहुलला लॉडरहिल येथे होणार्‍या केवळ 2 टी-20 सामन्यांमध्ये खेळण्याची संधी हवी आहे. केएल राहुलनेही लॉडरहिलमध्ये टी-20 शतक झळकावले आहे. 2016 मध्ये केएल राहुलने लॉंडरहिल येथे 51 चेंडूत 110 धावा केल्या होत्या.

भारतीय T20 संघाचे सदस्य त्रिनिदादला पोहोचले आहेत. कर्णधार रोहित शर्मा, ऋषभ पंत, आर अश्विन, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार हे टी-20 मालिकेसाठी संघाशी संबंधित आहेत. या सर्व खेळाडूंना वनडे मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती. त्याचबरोबर कुलदीप यादवही तंदुरुस्त झाल्यानंतर टीम इंडियात परतला आहे.

टी-२० मालिकेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, केएल राहुल, डी. , ऋषभ पंत, अर्शदीप सिंग, आवेश खान, हर्षल पटेल.

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result