भारतीय संघाचा पुढील सामना येत्या 2 नोव्हेंबर रोजी श्रीलंकेविरूद्ध रंगला. हा सामना मुबंईतील वानखेडे स्टेडियमवर रंगला होता. हा सामना झाल्यानंतर 5 नोव्हेंबर म्हणजेच उद्या भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी अतिशय खास असणार आहे. कारण यादिवशी विराटचा वाढदिवस आहे. त्याचा वाढदिवस आणखी खास बनवण्यासाठी ईडन गार्डन्स स्टेडियमवर खास तयारी केली जाणार आहे.
विराट कोहलीच्या वाढदिवसाच्या दिवशी कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर केप कापला जाईल. विशेष लेजर शो चं आयोजन केलं जाईल. यासह मोठ्या प्रमाणावर फटाकेही फोडण्यात येतील. मिळालेल्या माहितीनुसार इडन गार्डनवर लेसर शो तसेच आतशबाजी देखील असणार आहे. याच्या जोडीला 70,000 विराट कोहलीचे मास्क देखील प्रेक्षकांना वाटण्यात येणार आहेत.
या सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. त्यामुळे भारतीय खेळाडू विराटला विजयाचं गिफ्ट देण्याच्या प्रयत्नात असणार आहे. भारतीय संघाने आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत. या सर्व सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे. विराट कोहली आपला 35 वा वाढदिवस हा 5 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सान्यात खेळून साजरा करणार आहे. या हाय व्होल्टेज सामन्यात विराट कोहलीकडून सचिन तेंडुलकरच्या 49 वनडे शतकांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची अपेक्षा त्याचे चाहते करतील हे नक्की!