IPL 2024 Final Prize Ceremony  
क्रीडा

IPL 2024 फायनलनंतर खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, कोणत्या खेळाडूला किती रुपये मिळाले? पाहा संपूर्ण लिस्ट

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये आयपीएल २०२४ चा फायनलचा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात रंगला.

Published by : Naresh Shende

IPL 2024 Award Winners List : चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये आयपीएल २०२४ चा फायनलचा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात रंगला. या सामन्यात कोलकाताने हैदराबादने दिलेलं ११४ धावांचं लक्ष्य १०.३ षटकात पूर्ण करून आयपीएलचं जेतेपद जिंकलं. केकेआरने आयपीएलची तिसरी ट्रॉफी जिंकण्याचा कारनामा केला असून यंदाच्या हंगामात केकेआरला २० कोटी रुपये मिळाले. तर रनरअप हैदराबाद संघाला १२.५ कोटी रुपये मिळाले. याशिवाय पर्पल कॅपचा किताब पंजाब किंग्जचा गोलंदाज हर्षल पटेलला देण्यात आला. तर ऑरेंज कॅपने विराट कोहलीला सन्मानित करण्यात आलं. पटेलने अप्रतिम गोलंदाजी करून १४ सामन्यांमध्ये २४ विकेट घेतले. तर विराट कोहलीने १५ सामन्यांमध्ये ७४१ धावा कुटल्या.

या दोन्ही दिग्गजांशिवाय फँटेसी प्लेयर ऑफ द सीजनचा किताब केकेआरच्या सुनील नरेनला देण्यात आला. तर बेस्ट कॅचचा अवॉर्ड केकेआरच्या रमनदिप सिंगला मिळाला. तसच नरेनला यंदाच्या हंगामाचा सर्वात मोस्ट वॅल्युएबल प्लेयर म्हणून सन्मानित करण्यात आलं. सुनील नरेनने या संपूर्ण हंगामात १४ सामन्यांमध्ये ४८८ धावा केल्या. तसंच नरेनला १७ विकेट घेण्यातही यश मिळालं.

  • विनर - केकेआर - २० कोटी

  • रनरअप - हैदराबाद - १२.५ कोटी

  • स्ट्रायकर ऑफ द मॅच - व्येंकटेश अय्यर - १ लाथ

  • अल्टिमेट फँटेसी प्लेयर - मिचेल स्टार्क - १ लाख

  • सुपर सिक्सेज ऑफ द मॅच अवॉर्ड - व्येंकटेश अय्यर - १ लाख

  • सामन्यात सर्वात जास्त चौकार - रहमानुल्लाह गुरबाज - १ लाख

  • सर्वात जास्त डॉट बॉल - हर्षित राणा - १ लाख

  • प्लेयर ऑफ द मॅच - मिचेल स्टार्क - ५ लाख

  • एमर्जिंग प्लेयर - नितीश रेड्डी - १० लाख

  • स्ट्रायकर ऑफ द सीजन - फ्रेजर मॅकगर्क - १० लाख

  • फँटेसी प्लेयर ऑफ द सीजन - सुनील नरेन - १० लाख

  • सुपर सिक्सेज ऑफ द सीजन - अभिषेक शर्मा - १० लाख

  • सीजनमध्ये सर्वात जास्त चौकार - ट्रेविस हेड - १० लाख

  • बेस्ट कॅच - रमनदिप सिंग - १० लाख

  • फेयर प्ले अवॉर्ड - सनरायजर्स हैदराबाद - १० लाख

  • पर्पल कॅप - हर्षल पटेल - १० लाख

  • ऑरेंज कॅप - विराट कोहली - १० लाख

  • मोस्ट वॅल्यूएबल प्लेयर - सुनील नरेन - १० लाख

  • बेस्ट पिच अँड ग्राऊंड - हैदराबाद - ५० लाख

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी