देशात कोरोनाची वाढती रूग्णसंख्या पाहता, यंदाचा IPL हंगाम देखील भारतात खेळवला जाण्याची शक्यता कमीच दिसते आहे.
सध्या दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर भारतीय संघ तीन सामन्यांची वन-डे मालिका खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ स्वभूमीत परतेल व अवघ्या काही दिवसांतच IPL च्या १५व्या हंगामाला सुरूवात होईल. परंतू, ह्याच काळात देशामध्ये काेराोनाची तिसरी लाट देखील पसरली असेल. त्यामुळे, बीसीसीआय सध्या पर्यायी व्यवस्था म्हणून प्लॅन बी वर काम करत आहे.
२०२१ मधील IPL चा हंगाम देखील काेराेनामूळे मध्येच स्थगित करावा लागला हाेता व उर्वरित हंगाम UAE मध्ये खेळवला गेला हाेता. यंदाचा IPL चा हंगाम भारतात खेळवण्याचा विचार असला तरी काेराेनाची तिसरी लाट आल्यास हा हंगाम देखील देशाबाहेर खेळवावा लागेल असे चित्र दिसत आहे.
यंदाचा हंगाम हा खास असणार आहे कारण, एकूण संघांची संख्या ही ८ वरून १० करण्यात आली आहे. तसेच यंदा मेगा लिलाव देखील असणार आहे. जर काेराेनामूळे IPL परदेशी आयाेजित करावी तर, बीसीसीआय ची पहिली पसंती दक्षिण आफ्रिकेला असेल, असे सूत्रांकडकडून समजले आहे. त्याचबराेबर क्षीलंका हादेखील एक पर्याय असेल.