इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाआधी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाला मोठा धक्का बसला आहे. आरसीबीचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज जोश फिलिप आयपीएलमधून माघार घेतली आहे. आरसीबीने ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली.
ऑस्ट्रेलियाचा जोश फिलिप याने वैयक्तिक कारणास्तव आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. जोश फिलीपीने आयपीएलच्या 13 व्या हंगामात आरसीबीकडून पदार्पण केलं होतं. सलामीला येत त्याने 5 सामन्यात 78 धावा केल्या होत्या. पण यंदाच्या आयपीएलमधून त्याने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
फिन एलनला संघात स्थान
जोश फिलिपच्या जागी आरसीबीने न्यूझीलंडचा यष्टीरक्षक फलंदाज फिन एलनला याला संघात स्थान दिलंय.आयपीएल लिलावात 21 वर्षीय फिनवर कोणीही बोली लावली नव्हती. त्याची बेस प्राईस 20 लाख इतकी होती. फिनने न्यूझीलंडमधील स्थानिक स्पर्धेत शानदार फॉर्म दाखवला आणि 11 सामन्यात 56.88 च्या सरासरीने व 193 च्या स्ट्राइक रेटने 512 धावा ठोकल्या होत्या.