हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने FIH प्रो लीगच्या एका रोमांचक सामन्यात न्यूझीलंडचा 7-4 ने पराभव केला. भारतीय संघ सुरूवातीला 1-3 ने मागे होता परंतू जोरदार पुनरागमन करत सामना जिंकला.भारताने आक्रमक हॉकी खेळून अप्रतीम कामगिरी दाखवत शुक्रवारी FIH पुरूष प्रो लीगच्या रोमांचक सामन्यात न्यूझीलंडला 1-3 ने मागे टाकत 7-4 ने विजय मिळवला.28 ऑक्टोबर रोजी झालेल्या पहिल्या लेगच्या सामन्यात संघाने त्याच प्रतिस्पर्ध्याचा 4-3 ने पराभव केला होता.
पहिल्या 15 मिनिटांत संघाने संघर्ष केला ज्यामध्ये तीन गोल गमावले परंतु पुढील तीन क्वार्टरमध्ये दोन गोल करत संघाने आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. पहिल्या क्वार्टरमध्ये न्यूझीलंडने वर्चस्व गाजवले पण भारताकडून वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे ते दडपणाखाली आले आणि त्यानंतर पुढील तीन क्वार्टरमध्ये फक्त एक गोल करू शकले. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंग (7व्या आणि 19व्या मिनिटाला, दोन्ही पेनल्टी कॉर्नर), कार्ती सेल्वम (17वे आणि 38वे), राज कुमार पाल (31वे), सुखजित सिंग (50वे) आणि जुगराज सिंग (53वे) यांनी गोल केले.
न्यूझीलंडकडून सायमन चाइल्ड (दुसरा), सॅम लेन (9वा), स्मिथ जेक (14वा) आणि निक वुड्स (54वा) यांनी गोल केले. सामन्यादरम्यान भारताला 11 पेनल्टी कॉर्नर मिळाले, त्यापैकी तीनचे गोलमध्ये रूपांतर झाले. आक्रमक हॉकी खेळताना भारतीयांनी 29 वेळा वर्तुळ तोडले, त्या तुलनेत न्यूझीलंडने 13 वेळा.
बॉलवर भारताचे वर्चस्व 56 टक्के होते आणि प्रतिपक्षाच्या गोलमध्ये 12 शॉट्स होते, तर न्युझीलँडला केवळ सहा वेळा असे करता आले.
FIH प्रो लीग 2022-23 मधील भारताचा पुढील सामना रविवारी स्पेनशी होणार आहे. यानंतर, भारतीय पुरुष हॉकी संघ जानेवारीमध्ये ओडिशा येथे होणाऱ्या FIH पुरुष विश्वचषक 2023 वर लक्ष केंद्रीत करेल.