भारत विरुद्ध श्रीलंका टी २० मालिकेच्या अंतिम सामन्यात भारताची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार शिखर धवन खातंही खोलू शकला नाही. चमीराच्या गोलंदाजीवर धनंजय डिसिल्वाने त्याचा झेल घेतला.त्यानंतर एकापाठोपाठ एक असे तीन गडी झटपट बाद झाले. ऋतुराज गायकवड, देवदत्त पडिक्कल आणि संजू सॅमसन मैदानात तग धरू शकले नाहीत. ऋतुराज गायवड १४, देवदत्त पडिक्कल ९ तर संजू सॅमसन शून्यावर बाद झाला.
श्रीलंका दौर्यावर वनडे मालिका २-१ने जिंकल्यानंतर शिखर धवनच्या नेतृत्वात टीम इंडियाला टी-२० मालिका जिंकण्याची आज उत्तम संधी आहे. पहिला टी २० सामना भारताने ३८ धावांनी जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या टी २० सामन्यात श्रीलंकेने भारताला ४ गडी राखून पराभूत केलं होतं.