क्रीडा

Ind Vs Eng 4th T-20 : रोहित शर्मा, राहुल, विराट कोहली तंबूत परतले…

Published by : Lokshahi News

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असणाऱ्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताची सुरुवात अडचणीने झाली आहे. नाणेफेक जिंकून गोलंदाची घेतलेल्या इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरने दोन बळी घेतले. या पडझडीनंतर ऋषभ पंतला साथीला घेत सूर्यकुमारने किल्ला लढवला. त्याने 28 चेंडूत आपले अर्धशतक झळकावले. अखेर सूर्यकुमार देखील बाद झाला.

रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. रोहितने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. रशीदच्या पहिल्याच षटकात रोहित-राहुलने 12 धावा वसूल केल्या. रोहित-राहुल स्थिरावणार असे वाटत असताना आर्चरने रोहितला झेलबाद केले. सामन्याच्या चौथ्या षटकात रोहित बाद झाला. त्याने एक चौकार आणि एका षटकारासह 12 धावा केल्या.

रोहितनंतर आलेल्या सूर्यकुमारनेही आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर सूर्यकुमार-राहुलने आक्रमक फलंदाजी करत भारताची धावसंख्या वाढवली. सातव्या षटकात टीम इंडियाने आपले अर्धशतक पूर्ण केले. मागील दोन सामन्यात अपयशी ठरलेल्या राहुलकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, त्याला आर्चरने 14 धावांवर बाद केले. त्यानंतर आलेला विराट कोहलीही एक धाव काढून बाद झाला. त्याला रशीदने तंबूत धाडले.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर.

इंग्लंड : ईऑन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, आदिल रशीद, ख्रिस जॉर्डन, सॅम करन, मार्क वूड, जोफ्रा आर्चर.

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव

Lokshahi Marathi Live Update : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर राहावं-मंत्री उदय सामंत

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू