Team India Team Lokshahi
क्रीडा

Team India वेस्ट इंडिजनंतर झिंबाब्वे दौऱ्यावर जाण्याची शक्यता; असं असेल वेळापत्रक

सर्व शक्यता खऱ्या ठरल्यास भारतीय संघाचा हा सहा वर्षांनंतरचा झिम्बाब्वेचा दौरा असणार आहे.

Published by : Sudhir Kakde

टीम इंडिया पुढच्या महिन्यात झिम्बाब्वे दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी दोन्ही मंडळांनी सहमती दर्शवलीये, परंतु अद्याप या दौऱ्याला अधिकृत मान्यता मिळालेली नाही. मात्र आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार हे सामने 18, 20 आणि 22 ऑगस्टला होतील अशी शक्यता आहे. बीसीसीआय या दौऱ्यासाठी दुसऱ्या फळीतल्या खेळाडुंचा संघ पाठवू शकतं. यामध्ये काही पहिल्या फळीतले खेळाडूही असू शकतात. (The Indian cricket team will tour Zimbabwe for a three-match ODI series in August)

झिम्बाब्वेचे माजी प्रशिक्षक लालचंद राजपूत म्हणाले, “भारताविरुद्धची मालिका ही झिम्बाब्वेमधील क्रिकेट क्षेत्रातील लोकांसाठी मोठी संधी आहे. या मालिकेमुळे तरुण पिढीमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी मोठी उत्सुकता निर्माण होईल. सर्व शक्यता खऱ्या ठरल्यास भारतीय संघाचा हा सहा वर्षांनंतरचा झिम्बाब्वेचा दौरा असणार आहे. गेल्या वेळी एम.एस. धोनीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया जून-जुलै 2016 मध्ये झिम्बाब्वेला तीन एकदिवसीय, टी-20 सामन्यांसाठी गेली होती. या दौऱ्यात टी-20 सामन्यांची मालिका आयोजित केली जाणार नसून फक्त एकदिवसीय मालिका होणार आहे.

भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्याचं संभाव्य वेळापत्रक

पहिला एकदिवसीय सामना - 18 ऑगस्ट

2रा एकदिवसीय सामना - 20 ऑगस्ट

3रा एकदिवसीय सामना - 22 ऑगस्ट

टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर

भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे आणि टी-२० मालिकेत खेळतोय. भारताचा हा इंग्लंड दौरा १७ जुलैला शेवटच्या वनडे सामन्याने संपणार आहे. इंग्लंडनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे, वेस्ट इंडिजमध्ये तीन वनडे आणि 5 टी-20 सामने खेळणार आहे. विशेष म्हणजे टी-20 मालिकेतील शेवटचे दोन सामने अमेरिकेत खेळवले जाणार आहेत. वेस्ट इंडिजचा हा दौरा 22 जुलैपासून सुरू होणार असून शेवटचा सामना 7 ऑगस्टला होणार आहे.

टीम इंडिया आशिया कपमध्ये सहभागी होणार

वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार असून, त्यानंतर भारतीय संघ आशिया कपमध्ये सहभागी होणार आहे. 28 ऑगस्टला आशिया चषकात संघाचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. यावेळी आशिया कपचे यजमानपद श्रीलंकेकडे आहे. मात्र, आशिया चषकाच्या यजमानपदाची संपूर्ण परिस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result