आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा जलवा कायम असल्याचे दिसून येत आहे. भारताच्या ॲन्सी सोजन एडाप्पिल्लीने मोठा इतिहास रचला आहे. केरळच्या अॅन्सीने ही मोठी कमाल केली आहे. अॅन्सीने महिलांच्या लांब उडीत कडवी टक्कर देत रौप्यपदक जिंकलं आहे.
सध्य़ा आशियाई क्रीडा स्पर्धा चीनमध्ये खेळवल्या जात आहेत. या स्पर्धेतील भारतीय खेळाडू चांगलं प्रदर्शन करत आहेत. रविवारी एका दिवसात भारताला १५ पदकं जिंकण्यात यश आलं होतं. त्यानंतर भारतासाठी नववा दिवस देखील चांगला ठरत आहे. भारताला ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये २ पदकं मिळाल्यानंतर आणखी एका महिला लांब उडीपटूने पदकं जिंकून दिलं आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिलांचा लांब उडी इवेंट पार पडला. या प्रकाराच भारताच्या सोजन इडापिल्ली हीने रौप्य पदक जिंकले आहे. तिने ६ मीटर ६३ सेंटीमीटर उडी मारुन पदक आपल्या नावावर केले.