रविवारी, 28 जुलै रोजी भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी नोंदवत 7 गडी राखून विजय मिळवला. भारत आणि श्रीलंका यांच्यात सध्या सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना काल 28 जुलैला खेळला गेला. या मालिकेतील तिसरा सामना 30 जुलै रोजी होणार आहे.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेच्या संघाने कुसल परेराच्या 54 धावांच्या झंझावाती खेळीमुळे 20 षटकांत 9 गडी गमावून 161 धावा केल्या. पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात श्रीलंकेचा 7 गडी राखून पराभव केला. यासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.
श्रीलंकेच्या टीमने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी टीम इंडियाची ओपनिंग जोडी मैदानात उतरली मात्र, 6 रन्स करताच पावसामुळे मॅच रोखण्यात आली. अखेर डकवर्थ लुईसच्या नियमानुसार, टीम इंडियाला विजयासाठी 78 रन्सचं आव्हान देण्यात आलं. टीम इंडियाला देण्यात आलेलं हे आव्हान अगदी सहज गाठलं आणि श्रीलंकेला पराभूत केलं. टीम इंडियाने या विजयासोबतच टी-20 सीरिज 2-0ने आपल्या खिशात घातली. टीम इंडियाने 6.3 ओव्हर्समध्ये 3 विकेट्स गमावत 81 रन्स केले आणि मॅच जिंकली.