आज भारत आणि इंग्लंड ( IND vs ENG) यांच्यात आज दुसरी वनडे लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. आजची लढत भारतीय संघासाठी खास असणार आहे. भारतीय संघाने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून दुसरी मॅच जिंकून मालिका जिंकण्याची संधी आहे. पहिल्या वनडे सामन्यात भारताने १० विकेटनी दणदणीत विजय मिळवला होता. आता दुसऱ्या लढतीत तशीच कामगिरी करण्याची टीम इंडियाची तयारी आहे.
जर आज रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने इंग्लंडचा पराभव केला तर वनडे, टी-२० आणि कसोटी मिळून भारताचा इंग्लंडविरुद्धचा १००वा विजय ठरले. पहिल्या सामन्यात शानदार गोलंदाजी करणाऱ्या जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद शमी यांना या मैदानावर फायदा होऊ शकतो.
वनडे खेळाला दुपारी ३.३० वाजता सुरूवात होईल आणि त्याचा टॉस ३ वाजता होईल. विराटला (Virat Kohli) झालेल्या दुखापतीबद्दल अपडेट आलेली नाही. त्यामुळे तो दुसरी वनडे देखील खेळणार नसल्याचे मानले जाते आहे. अशात श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो.