क्रीडा

वेस्ट इंडिजविरुद्ध यशस्वी जैस्वालची बॅट तळपली; अनेक विक्रम नावावर

वेस्ट इंडिजविरुद्धच्या डोमिनिका कसोटी सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालची बॅटने तळपली आहे. त्याने या कसोटीत असे अनेक विक्रम केले.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात यशस्वी जैस्वालची बॅट तळपली आहे. कसोटी पदार्पणातच शतक झळकावणारा यशस्वी जैस्वाल हा पहिला भारतीय सलामीवीर ठरला आहे. याशिवाय त्याने या कसोटीत अनेक विक्रम केले. त्याच्यासोबत कर्णधार रोहित शर्मानेही आपले शतक पूर्ण केले.

या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्याच दिवशी संपूर्ण संघ 150 धावांवर बाद झाला. अशा प्रकारे टीम इंडियाने यजमान संघ वेस्ट इंडिजवर आतापर्यंत पहिल्या डावात 162 धावांची आघाडी घेतली आहे. भारतीय संघासाठी पहिल्या डावात कर्णधार रोहित शर्माने 221 चेंडूत 103 धावांची शतकी खेळी केली. तर यशस्वी जैस्वालने शतक झळकावून इतिहास रचला आहे. सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत यशस्वीने 350 चेंडूत नाबाद 143 धावा केल्या. यादरम्यान त्याने 14 चौकार मारले होते.

परदेशी भूमीवर सलामीवीर म्हणून शतक झळकावणारा यशस्वी पहिला भारतीय ठरला आहे. यापूर्वी सुधीर नाईकने इंग्लंडमध्ये (1974) 77 धावा केल्या होत्या. एकंदरीत शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी पदार्पणाच्या कसोटीत सलामीवीर म्हणून शतके झळकावली होती. पण, हे शतक देशांतर्गत कसोटीत करण्यात आले होते.

याशिवाय पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारा यशस्वी एकूण भारतीयांपैकी १७वा फलंदाज ठरला आहे. म्हणजेच त्याच्या आधी भारताच्या १६ फलंदाजांनी पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावले आहे. तर पदार्पणाच्या कसोटीतील सर्वोत्तम धावसंख्येचा विक्रम धवनच्या नावावर आहे.

यशस्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये 80.21 च्या मजबूत सरासरीसह टीम इंडियामध्ये कसोटी पदार्पण करणारा तिसरा फलंदाज बनला आहे. जेव्हा सचिनने भारतीय संघाकडून कसोटीत पदार्पण केले होते. त्यावेळी त्याची सरासरी 70.18 होती. स्थानिक क्रिकेटमध्ये ८८.३७ च्या सरासरीने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विनोद कांबळीच्या नावावर आहे.

रोहित आणि यशस्वी यांनी भागीदारीचा विक्रमही केला आहे. दोघांनी वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय सलामीची सर्वात मोठी भागीदारी केली आहे. या सामन्यात रोहित आणि यशस्वी यांनी 229 धावांची सलामी दिली. अशाप्रकारे त्याने वीरेंद्र सेहवाग आणि संजय बांगर यांचा विक्रम मोडला आहे.

सौरव गांगुलीचा स्कोअर 1996 मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात 131 होता. तर, आता जयस्वाल (नाबाद 143) परदेशात पदार्पण करणाऱ्या भारतीयाने केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे.

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा