पुणे : भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा टी 20 सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून श्रीलंकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. या सामन्यात भारताकडून राहुल त्रिपाठीला पदार्पणाची संधी मिळाली. त्याचवेळी वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगही बरा होऊन प्लेइंग-11 मध्ये परतला. मात्र, या सामन्यात चांगला खेळ दाखवता आला नाही.
श्रीलंकेच्या डावातील दुसरे ओव्हर टाकायला आलेल्या अर्शदीप सिंगने सलग तीन नो-बॉल टाकले. अर्शदीपच्या त्या ओव्हरमध्ये एकूण २१ धावा झाल्या. एवढेच नाही तर अर्शदीपने त्याच्या पुढच्या षटकात दोन नो-बॉलही टाकले. म्हणजेच अर्शदीपने दोन ओव्हरमध्ये एकूण पाच नो-बॉल टाकले. अर्शदीपने दोन षटकात एकूण 37 धावा केल्या.
अर्शदीप सिंगच्या या कामगिरीने भारतीय चाहते आश्चर्यचकित झाले. त्याने ट्विटरवर मीम्सच्या माध्यमातून या अर्शदीपला ट्रोल केले आहे. एका चाहत्याने म्हंटले, भाऊ काय करतोयस. त्याचवेळी अर्शदीप कसले-कसले रेकॉर्ड बनवत आहे, असेही म्हंटले आहे.
अर्शदीप सिंग प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईत झालेल्या पहिल्या टी-२०मध्ये सहभागी होऊ शकला नाही. अर्शदीप सिंगच्या जागी शिवम मावीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. मावीने आपल्या पहिल्याच सामन्यात छाप सोडताना एकूण 22 धावांत चार बळी घेतले. पदार्पणातील भारतीय गोलंदाजाची ही तिसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली.