क्रीडा

बीसीसीआयने श्रीलंका मालिकेसाठी टीम इंडियाची केली घोषणा , हार्दिक पांड्या कर्णधार तर सूर्यकुमार उपकर्णधार

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20 मालिका आणि तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20 मालिका आणि तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. हार्दिक पांड्या टी-20 मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार असेल. तर उपकर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे आहे. मात्र, एकदिवसीय मालिकेत केवळ रोहित शर्माच टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे.

शिवम मावी, मुकेश कुमार आणि राहुल त्रिपाठी या युवा खेळाडूंना टी-20 मालिकेसाठी टीम इंडियामध्ये संधी मिळाली आहे. त्याचवेळी, केएल राहुल आणि ऋषभ पंत टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचा भाग नाहीत. याशिवाय रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह हे देखील टी-२० मालिकेत नाहीत.

एकदिवसीय मालिकेत हार्दिक पांड्याला रोहित शर्माचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. भविष्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, एकदिवसीय मालिकेत ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह नसून वनडे मालिकेत विराट कोहली आणि केएल राहुल यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर मोहम्मद शमीचेही वनडेत संघात पुनरागमन झाले आहे. शिखर धवनला वनडे मालिकेसाठी टीम इंडियात स्थान मिळालेले नाही. याआधी अनेक वेळा धवनने वनडे फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी टीम

इंडिया - हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन, रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी आणि मुकेश कुमार.

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम

इंडिया - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग.

भारत-श्रीलंका मालिकेचे पूर्ण वेळापत्रक

T20 मालिका:

भारत विरुद्ध श्रीलंका पहिला T20 आंतरराष्ट्रीय: 3 जानेवारी - वानखेडे स्टेडियम, मुंबई.

भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा T20 आंतरराष्ट्रीय: 5 जानेवारी - महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे.

भारत विरुद्ध श्रीलंका तिसरा T20 आंतरराष्ट्रीय: 7 जानेवारी - सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट.

एकदिवसीय मालिका:

भारत विरुद्ध श्रीलंका पहिला एकदिवसीय: 10 जानेवारी - बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी.

भारत विरुद्ध श्रीलंका दुसरी वनडे: १२ जानेवारी - ईडन गार्डन्स, कोलकाता.

भारत विरुद्ध श्रीलंका तिसरा एकदिवसीय: 15 जानेवारी - ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम, तिरुवनंतपुरम.

Rajesaheb Deshmukh Parli Assembly election 2024 : परळीत हाय व्होल्टेज सामना! राजेसाहेब देशमुख विरुद्ध धनंजय मुंडे

Dhananjay Munde Parli Assembly election 2024 : धनंजय मुंडेंसमोर मराठा उमेदवाराचे आव्हान

PM Modi Sabha LIVE: पंतप्रधान मोदी यांच्या सभेला अजित पवारांची पाठ

Latest Marathi News Updates live: राहुल गांधी यांनी अचानक नांदेडच्या बसस्थानकात दिली भेट,नागरिकांशी साधला संवाद

Matheran | कड्यावरच्या गणपती परिसरात बिबट्याचा वावर ; व्हायरल फोटोने खळबळ