वाँडर्स मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात भारताचा फलंदाजीचा दुसरा डाव सूरू आहे. यामध्ये भारताने 160 धावांवर 4 गडी गमावले आहेत. सध्या हनुमा विहारी आणि अश्विन मैदानावर आहेत.
कालच्या दोन बाद 85 वरुन भारताने डाव पुढे सुरु केला आहे. अर्धशतकी खेळीनंतर अजिंक्य रहाणे (58) धावांवर बाद झाला. रबाडाच्या गोलंदाजीवर त्याने कार्ल वेरेनकडे झेल दिला. अजिंक्य रहाणे पाठोपाठ चेतेश्वर पुजारा बाद झाला आहे. त्याला 53 धावांवर पायचीत पकडलं. दोन्ही सेट फलंदाज होते. रबाडाने या दोन्ही विकेट घेतल्या. त्यानंतर खातही न उघडता माघारी परतला आहे. सध्या हनुमा विहारी आणि अश्विन मैदानावर आहेत.
भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यातील पहिल्या डावात भारताने सर्व गडी गमवून २०२ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण अफ्रिका संघाने सर्वबाद २२९ धावा केल्या आणि २७ धावांचा लीड घेतला. दुसऱ्या डावात भारतीय संघ फलंदाजीसाठी आला
तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकत १-० ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा भारताचा प्रयत्न आहे. तर दक्षिण अफ्रिका हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करत आहे.