भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पहिल्या डावाला सुरूवात झाली आहे. सुरूवातीलाच कर्णधार डीन एल्गरच्या रुपाने दक्षिण आफ्रिकेला पहिला झटका बसला आहे. तर दुसरा झटका बसला आहे. कीगन पीटरसनला (15) धावांवर मोहम्मद शामीने केले बाद.दक्षिण आफ्रिकेच्या 2 बाद 30 धावा झाल्या आहेत.
पहिल्या दिवशी 3 गड्यांच्या बदल्यात 272 धावा केलेला भारताचा पहिला डाव 327 धावात आटोपला. शतकवीर केएल राहुल (123) माघारी परतला. कगिसो रबाडाने त्याला यष्टीरक्षक क्विंटन डीकॉककरवी झेलबाद केलं.जसप्रीत बुमराह 14 धावांवर बाद, पंत 8 आणि अश्विन 4 धावांवर आऊट.मोहम्मद शामी आठ धावांवर बाद झाला.
दक्षिण आफ्रिकेच्या डावाला सुरुवात झाली असून कर्णधार डीन एल्गरच्या रुपाने त्यांना पहिला झटका बसला आहे. एल्गरला अवघ्या एक रन्सवर बुमराहने विकेटकिपर पंतकरवी झेलबाद केले.मार्कराम-पीटरसन खेळपट्टीवर स्थिरावले आहेत. एडेन मार्कराम (9) आणि कीगन पीटरसन (11) आता खेळपट्टीवर स्थिरावण्याचा प्रयत्न करत आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या एक बाद 21 धावा झाल्या आहेत.