भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे सामना सुरु होण्यास विलंब होत आहे. दरम्यान दिवसअखेरीस भारताच्या तीन बाद 272 धावा झाल्या होत्या.
पहिल्या दिवसाच्या खेळावर पूर्णपणे भारताने वर्चस्व गाजवलं होतं. दिवसअखेरीस भारताच्या तीन बाद 272 धावा झाल्या होत्या. सलामीवीर केएल राहुलने शानदार शतक झळकावल असून तो (122) धावांवरुन आज डाव पुढे सुरु करेल. त्याला उपकर्णधार अजिंक्य रहाणे (साथ देईल. रहाणे (40) धावांवर नाबाद आहे.
मयांक अग्रवाल आणि राहुलने काल पहिल्या विकेटसाठी 117 धावांची भागीदारी केली. त्यांच्या दमदार सलामीमुळे भारताला पहिल्या दिवसाच्या खेळावर वर्चस्व गाजवता आलं. मयांकला (६०) धावांवर निगीडीने पायचीत केले. कर्णधार विराट कोहलीला चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्यात अपयश आले. तो (35) धावांवर बाद झाला. चेतेश्वर पुजारा भोपळाही न फोडता आल्यापावली माघारी परतला.
दरम्यान दुसरा दिवसाचा खेळ सूरू झाला आहे. पावसामुळे नियोजित वेळेत सामना सुरु होऊ शकलेला नाही. सध्या पाऊस थांबला असून मैदान सुकवण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे थोडा उशिराने सामना सुरु होईल.