भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज अखेरचा निर्णायक सामना खेळवला जात आहे. मात्र या सामन्यात पावसामुळे मोठा खोळंबा निर्माण झाला होता. तूर्तास पावसामुळे खेळ थांबला होता. भारताने नऊ षटकांत चार गडी गमावून ७५ धावा केल्या होत्या. या स्थितीत भारताला सध्या 66 चेंडूत 86 धावांची गरज होती. डकवर्थ-लुईस नियमानुसार, नऊ षटकांनंतर समान स्कोअर फक्त 75 धावा आहे, जो भारताने बनवला आहे. जर पाऊस थांबला नाही तर सामना टाय घोषित केला जाईल. त्यानंतर डकवर्थ लुइस नियमानुसार तिसरी मॅच टाय झाली आहे. दुसरा सामना भारताने जिंकला होता. त्यामुळे भारताने तीन सामन्यांची न्यूझीलंड विरुद्ध सीरीज 1-0 ने जिंकली.