SAFF चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारत चांगल्या परिस्थितीत दिसत आहे. भारतीय संघ आता अंतिम सामन्यात पोहचली आहे. आज बेंगळुरूच्या कांतेराव स्टेडियमवर भारत आणि गतविजेता कुवेत यांच्यात अंतिम सामना होणार आहे.
भारताने उपांत्य फेरीत पेनल्टी शूटआऊटमध्ये लेबनॉनचा 4-2 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता, तर कुवेतने अतिरिक्त वेळेत बांगलादेशचा 1-0 असा पराभव केला. या स्पर्धेतील ही दुसरी वेळ असेल जेव्हा हे दोन्ही संघ भिडतील. याआधी गटाच्या लढतीत दोन्ही संघांमधील सामना १-१ असा बरोबरीत सुटला होता.
कधी, कुठे खेळवला जाणार अंतिम सामना?
भारत आणि कुवेत यांच्यातील विजेतेपदाचा सामना 4 जुलै 2023 (मंगळवार) रोजी होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून सामन्याला सुरुवात होईल. बेंगळुरूच्या श्री कांतीरवा स्टेडियमवर सामना होणार आहे.
असे असतील दोन्ही संघ?
भारत संघ:
सुनील छेत्री (कर्णधार), अमरिंदर सिंग (गोलकीपर), अन्वर अली, संदेश झिंगन, आकाश मिश्रा, निखिल पुजारी, अनिरुद्ध थापा, नौरेम महेश सिंग, जॅक्सन सिंग, लल्लियांझुआला चांगटे, आशिक कुरुनियान.
कुवेत संघ:
अब्दुलरहमान मारझौक, अहमद अल्देफेरी, हसन अलानेजी, सुलतान अलानेजी, मोहम्मद अब्दुल्ला, शबैब अलखाल्दी, ईद अलराशिदी, हमाद अलहरबी, अब्दुल्ला फहद, रेडा अबुजबराह, हमाद अलकालाफ.