टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज तिसरा टी 20 सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार असून संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.
या मालिकेत काही खेळाडूंना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. पदार्पणातील सामन्यात इशान किशनने शानदार अर्धशतकी खेळी केल्याने शिखर धवन आणि केएल राहुलसमोर आव्हान असणार आहे. यामुळे तिसऱ्या सामन्यातही शिखर धवनला बाहेर बसावे लागू शकते. तर केएलसमोर चांगली खेळी करण्याचे आव्हान असेल.तसेच मुंबईकर रोहित शर्माला पहिल्या 2 सामन्यात संधी न मिळाल्याने तिसऱ्या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे.
टी 20 मध्ये नंबर 1ची संधी
भारताला टी 20 रँकिंगमध्ये अव्वल क्रमांक पटकावण्यासाठी ही मालिका 4-1 अशा फरकाने जिंकावी लागणार आहे. यासाठी टीम इंडियाचा हा तिसरा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान ही 5 सामन्याची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. भारतीय संघाने दुसरा सामना जिंकत मालिकेत पुनरागमन केलं आहे.
टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत(यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दिपक चहार, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर.
इंग्लंड टीम : इयन मॉर्गन (कॅप्टन), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलींग्ज, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिंग्विनस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रिस टोपेल आणि मार्क वुड.