दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताने 7 विकेट्स राखत इंग्लंडवर मोठा विजय मिळवला आहे. कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद 67 धावांच्या खेळीने व इशान किशनच्या 56 धावामुळे हा विजय मिळवता आला. त्यामुळे भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे.
भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. इंग्लडच्या फलंदाजीत जोस बटलरला भोपळाही न फोडू देता एलबीडब्ल्यू आउट केलं.डेव्हिड मलानला(२४), जेसन रॉयला(४६), जॉनी बेअरस्टोला(२०)ईऑन मॉर्गनला(२८), बेन स्टोक्सचा(२४) धावा केल्या. २० षटकांमध्ये सहा गडी गमावून इंग्लडची एकूण धावसंख्या १६४ झाली.
इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान टीम इंडियाने 3 विकेट्सच्या मोबदल्यात 17.5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. कर्णधार विराट कोहली आणि पदार्पणवीर इशान किशन या दोघांनी विजयी खेळी साकारली. विराट कोहलीने नाबाद 67 धावा केल्या. तर इशान किशनने 56 धावांची खेळी केली. तर पंतनेही 26 धावांची खेळी केली. भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे.