टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना आज खेळवला जाणार आहे. पुण्याच्या एमसीए क्रिकेट ग्राऊंडवर हा सामना पार पडणार आहे. या सामन्यात विजय नोंदवून मालिका खिशात घालण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मधल्या फळीतील बॅट्समन श्रेयस अय्यर दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. त्याला पहिल्या मॅचदरम्यान फिल्डिंग करताना दुखापत झाली होती. अय्यरच्या जागी कुणाला संधी मिळते, हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. अय्यरच्या जागी सूर्यकुमारला संधी मिळू शकते, असा अंदाज आहे.
भारतीय संघाने पहिल्या सामन्यात 66 धावांनी इंग्लंडला पराभूत करुन मालिकेत विजयी सुरुवात केली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी विजयी सलामी नोंदवली आहे.
इंग्लंडची टीम : इयॉन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, मोईन अली, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलिंग्स, जॉस बटलर, सॅम करन, टॉम करन, लियम लिविंगस्टोन, मॅट पर्किंसन, आदिल रशीद, बेन स्टोक्स, रीस टॉपले, मार्क वुड, ख्रिस जॉर्डन, जॅक बॉल आणि डेव्हिड मलान.
टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, केएल राहुल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर.