इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने 5 गडी गमावून 317 धावा ठोकल्या आहेत. शिखर धवनच्या 98 आणि कोहली, कृणाल व राहुलच्या अर्धशतकीय खेळीने इतकी धावसंख्या उभारण्यास भारताला यश आले आहे. दरम्यान आता इंग्लंड समोर 318 धावांच्या आव्हान असणार आहे.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे भारत प्रथम फलंदाजीस उतरला होता. यावेळी सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी अर्धशतकी सलामी देत चांगली सुरुवात करून दिली. मात्र रोहित शर्मा 28 वर बाद झाला. तर धवन या सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. मात्र तो शतक ठोकू शकला नाही. धवनने 11 चौकार आणि 2 षटकारांसह 98 धावांची खेळी साकारली. त्यांनतर विराट कोहली संयमीने फलंदाजी करत 56 धावा केल्या. श्रेयस अय्यर 6 धावा करून स्वस्तात माघारी गेला. तर हार्दिक पांड्या 1 धाव करून बाद झाला. के एल राहुल 62 धावांवर व कृणाल पांड्या 58 धावांवर नाबाद आहेत.
भारताने 5 गडी गमावून 317 धावा ठोकल्या आहेत.यामध्ये बेन स्टोक्सने 3 तर मार्क वूड ने 2 विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे आता इंग्लंड समोर 318 धावांचे आव्हान असणार आहे.