IND vs CAN, T20 World Cup 
क्रीडा

T20 World Cup 2024: फ्लोरिडाच्या मैदानात रंगणार भारत विरुद्ध कॅनडा सामना; 'अशी' असेल संभाव्य प्लेईंग ११, जाणून घ्या पिच रिपोर्ट

Published by : Naresh Shende

IND vs CAN, T20 World Cup 2024 : भारत आणि कॅनडा यांच्यात फ्लोरिडाच्या मैदानात टी-२० वर्ल्डकप २०२४ चा ग्रुप-ए चा सामना खेळवला जाणार आहे. परंतु, या सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. सेंट्रल ब्रोवार्ड रिजनल पार्क स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात येणार आहे. सलग तीन सामन्यांमध्ये विजय मिळवून भारताने सुपर ८ साठी क्वालिफाय झाला आहे. या सामन्यात पाऊस पडला, तरीही टीम इंडियाच्या समीकरणावर कोणताच परिणाम होणार नाही. मागील काही दिवसांपासून फ्लोरिडातील हवामान खराब आहे. मुसळधार पाऊस कोसळल्याने त्या ठिकाणी पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच सामना पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे.

भारताची संभाव्य प्लेईंग ११

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.

कॅनडा संभाव्य प्लेईंग ११

आरोन जॉनसन, नवनीत धालीवाल, परगट सिंग, निकोलस किरटन, श्रेयस मोव्वा (विकेटकीपर), रविंदरपाल सिंग, साद बिन जफर (कर्णधार), डिलन हेलीगर, कलीम सना, जुनैद सिद्दीकी, जेरेमी गॉर्डन

पिच रिपोर्ट

लॉडरहिलच्या मैदानावर आतापर्यंत १८ टी-२० सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला ११ सामन्यांमध्ये विजय मिळाला आहे. तर प्रथम क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने ४ सामने जिंकले आहेत. या मैदानावर २४५ हा सर्वाधिक स्कोअर आहे. तर ७६ हा सर्वात लहान स्कोअर या मैदानावर झाला आहे. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी जास्त पोषक आहे. याशिवाय या मैदानात भारताने टी-२० चे एकूण ८ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये भारताने ५ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे, तर २ सामन्यांमध्ये भारताचा पराभव झाला आहे.

कसं आहे फ्लोरिडाचं हवामान?

व्हेदर.कॉमच्या रिपोर्टनुसार, फ्लोरिडात पूर्ण दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज आहे. फ्लोरिडाच्या लॉडरहिलमध्ये पावसाची शक्यता दिवसा ५७ टक्के तर रात्री २४ टक्के वर्तवण्यात आली आहे. सामना सुरु असताना पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. याचा परिणाम सामन्यावर होऊ शकतो.

Ajit pawar | माळेगावातील संस्थेला अजित पवारांच्या वडिलांचे नाव

Navratri Special | भक्त्तांच्या हाकेला धावणारी वरळीची ग्रामदेवता ; काय आहे जरीमरी देवीची अख्यायिका?

Bharti Singh: लाफ्टर क्विन भारती सिंगचा नवरात्रीनिमित्त खास लूक पाहा "हे" फोटो...

NIA And ATS Big Action In Maharashtra : राज्यात तीन ठिकाणी ATS आणि NIAचे छापे

Navratri2024: नवरात्रीच्या उपवासाला जड पदार्थांचे सेवन करण्यापेक्षा वरीचा भात आणि स्वादिष्ट शेंगदाण्याची आमटी एकदा करून पाहा.