भारत आणि बांग्लादेशमध्ये चटोग्राम येथे कसोटी सामना सुरु आहे. आज पहिल्या कसोटीचा तिसरा दिवस होता. या कसोटीत टीम इंडिया मजबूत स्थितीमध्ये आहे. मात्र, बांग्लादेशची टीम बॅकफूटवर आहे. आज कसोटीच्या शेवटच्या सत्रात गोलंदाजांना यश मिळालं नाही. पण अजून या कसोटीचे दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे भारताची कसोटी विजयाची संधी आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने पहिल्या डावात 404 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ पहिल्या डावात 150 धावांवर गारद झाला. अशा प्रकारे टीम इंडियाला 254 धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाने 258 धावा करत बांगलादेशसमोर 513 धावांचे लक्ष्य ठेवले.
513 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना यजमान बांगलादेश संघाने तिसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत विकेट न गमावता 41 धावा केल्या आहेत. झाकीर हसन 19 आणि नजमुल हुसेन 22 धावा करून नाबाद आहेत. आता चौथ्या दिवशी सामना जिंकून भारतीय संघाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
भारताने बांगलादेशला विजयासाठी 513 धावांचे लक्ष्य दिले आहे. भारताने आपला दुसरा डाव 2 बाद 258 धावा करून घोषित केला. चेतेश्वर पुजाराने दुसऱ्या डावात नाबाद 102 धावांची खेळी केली. पुजाराने तब्बल चार वर्षांनंतर शतक झळकावले आहे. यापूर्वी पुजाराचे शेवटचे शतक जानेवारी 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाले होते. गिलने भारतासाठी दुसऱ्या डावातही शानदार 110 धावा केल्या.
चेतेश्वर पुजाराने दुसऱ्या डावातही आपले अर्धशतक पूर्ण केले. मिराजच्या चेंडूवर चौकार मारून पुजाराने ही कामगिरी केली. पुजाराने 87 चेंडूंच्या खेळीत पाच चौकार मारले आहेत. भारताची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 189 धावा असून त्यांची आघाडी आता 443 धावांची आहे. कोहली आणि पुजारा क्रीजवर आहेत. शुभमन गिलने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले आहे. गिलने मेहदी मिराजच्या चेंडूवर चौकार मारून शतक पूर्ण केले. गिलने आपल्या 12व्या कसोटी सामन्यात ही कामगिरी केली आहे. गिलने 147 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. गिलने या खेळीत 10 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत. 49 षटकांनंतर भारताची धावसंख्या एका विकेटवर 177 आहे.
तिसऱ्यादिवस अखेर बांग्लादेशच्या बिनबाद 42 धावा झाल्या आहेत. बांग्लादेशची टीम अजून 471 धावांनी पिछाडीवर आहे. सलामीवर नजमुल शांटो 25 आणि झाकीर हसने 17 धावांवर खेळतोय. टीम इंडियाकडून पहिल्या डावात कुलदीप यादवने सर्वाधिक 5, मोहम्मद सिराजने 3, उमेश यादव-अक्षर पटेलने प्रत्येकी 1 विकेट घेतला.