India vs Afghanistan, T20 World Cup 2024 
क्रीडा

IND vs AFG: भारत-अफगानिस्तान आमनेसामने; 'हा' खेळाडू ठरु शकतो टीम इंडिसाठी एक्स फॅक्टर; प्लेईंग ११ मध्ये मिळणार संधी?

टी-२० वर्ल्डकप २०२४ च्या सुपर-८ मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना अफगानिस्तानविरोधात गुरुवारी रात्री ८ वाजता सुरु होणार आहे.

Published by : Naresh Shende

India vs Afghanistan, T20 World Cup 2024 : टी-२० वर्ल्डकप २०२४ च्या सुपर-८ मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना अफगानिस्तानविरोधात गुरुवारी रात्री ८ वाजता सुरु होणार आहे. वेस्टइंडिजच्या बारबाडोस मैदानात हा सामना खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने या सामन्यासाठी एका खास खेळाडूला संधी दिली पाहिजे. या खेळाडूला आतापर्यंत झालेल्या एकाही सामन्यात प्लेईंग ११ मध्ये संधी मिळाली नाही.

अफगानिस्तानविरोधात होणाऱ्या सामन्यात यशस्वी जैस्वालला सलामी फलंदाज म्हणून संधी मिळाली पाहिजे. विराट कोहली सलामी फलंदाज म्हणून तिनही सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला आहे. विराटने तिनही सामन्यांमध्ये एकूण १० धावाही केल्या नाहीत. आयसीसी टूर्नामेंटमध्ये विराटसोबत असं पहिल्यांदाच घडलं असेल, जेव्हा विराट सलग तिनही सामन्यांमध्ये फ्लॉप राहिला आहे. यामुळे यशस्वी जैस्वालला अफगानिस्तान विरोधात होणाऱ्या सामन्यात संधी मिळाली पाहिजे.

जर यशस्वी जैस्वालला संधी दिली, तर जैस्वाल टीम इंडियासाठी एक्स फॅक्टर होऊ शकतो. जैस्वालच्या खेळण्यामुळं टीममध्ये लेफ्ट-राईटचं चांगलं कॉम्बिनेशन बनेल. त्यामुळे गोलंदाजांना अडचण निर्माण होईल. याशिवाय जैस्वाल पॉवर प्ले मध्ये आक्रमक फलंदाजी करून सर्वात जास्त धावा करु शकतात.

अफगानिस्तानचा लेफ्ट आर्म पेसर फजलहक फारुखी जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. अशातच फारुखीच्या गोलंदाजीचा समाचार घेण्यासाठी जैस्वाल एक चांगला विकल्प ठरू शकतो. लेफ्ट आर्म पेसरविरोधात खेळताना विराट कोहलीला अडचण निर्माण होत आहे. बारबाडोस या पिचवर धावांचा पाऊस पडतो. ही खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक आहे. अशातच जैस्वाल त्याच्या आक्रमक फलंदाजीने सुरुवातीलाच अफगानिस्तानच्या गोलंदाजांवर दबाव टाकू शकतो.

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड