India vs Afghanistan  
क्रीडा

T20 World Cup 2024: सुपर 8 मध्ये आज भारत-अफगानिस्तान भिडणार; 'अशी' आहे टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग ११

टी-२० वर्ल्डकप २०२४ मध्ये भारत विरुद्ध अफगानिस्तानमध्ये सुपर ८ चा सामना आज रंगणार आहे. हा सामना बारबाडोस मैदानात खेळवला जाणार आहे.

Published by : Naresh Shende

Indias Probable XI vs AFG : टी-२० वर्ल्डकप २०२४ मध्ये भारत विरुद्ध अफगानिस्तानमध्ये सुपर ८ चा सामना आज रंगणार आहे. हा सामना रात्री ८ वाजता बारबाडोस मैदानात खेळवला जाणार आहे. भारताने ग्रुप स्टेजमध्ये विजयी पताका फडकावली आहे. अफगानिस्तानने ग्रुप स्टेजच्या ४ पैकी ३ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर एका सामन्यात अफगानिस्तानचा पराभव झाला आहे. बारबाडोसची खेळपट्टी फिरकीपटूंना पोषक होऊ शकते. अशातच भारतीय संघाच्या प्लेईंग ११ मध्ये बदलाव पाहायला मिळू शकतो. द्रविडनेही पत्रकार परिषदेत याबाबत संकेत दिले आहेत.

टॉप ऑर्डरमध्ये होणार मोठे बदल?

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतासाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा सलामीला फलंदाजी करणार आहेत. रिषभ पंत ३ नंबरवर, तर सूर्यकुमार यादव ४ नंबरवर फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. सलामी फलंदाज म्हणून विराट कोहलीहा अद्यापही धावांचा सूर गवसला नाही. परंतु, आता सुपर ८ च्या सामन्यांमध्ये खेळपट्टी बदलली आहे. त्यामुळे फलंदाजी करणं सोपं होणार आहे. अशातच कोहलीच्या फलंदाजी क्रमात बदल होण्याची शक्यता आहे.

हार्दिक, दुबे, अक्षर आणि जडेजा अष्टपैलू म्हणून खेळणार?

हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा अष्टपैलू खेळाडू म्हणून आजच्या सामन्यात खेळू शकतात. दुबेनं अमेरिकेविरोधात झालेल्या सामन्यात चमकदार कामगिरी केली. त्यामुळे या सामन्यातही दुबेला संधी मिळू शकते. हार्दिकने या टूर्नामेंटमध्ये गोलंदाजीत प्रभावी कामगिरी केली नाही. तसत जडेजालाही आतापर्यंत झालेल्या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करता आली नाही. परंतु, जडेजाने बारबाडोसच्या मैदानावर याआधी अप्रतिम कामगिरी केलीय.

कुलदीपचं होणार पुनरागमन?

भारताकडे युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव आहे. परंतु, आजच्या सामन्यात स्टार फिरकीपटू कुलदीप यादवला संधी मिळू शकते. कुलदीप यादवचा प्लेईंग ११ मध्ये समावेश करा, अशी मागणी अनेक दिग्गज करत आहेत. जर कुलदीपला संघात सामील केलं, तर मोहम्मद सिराजला बाहेर बसावं लागू शकतं.

भारताची संभाव्य प्लेईंग ११

रोहित शर्मा, विराट कोहली, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी