लोकशाही न्यूज नेटवर्क
कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गोलंदाजांच्या आक्रमक माऱ्यापुढे यजमान इंग्लंडला गुढगे टेकण्याची वेळ ओढावली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाची पकड मजबूत आहे. पहिल्या डावात त्रिशतकी धावसंख्या उभारल्याने भारताला या कसोटी सामन्यात लिड मिळाले. त्यातच आज दिवसभरात भारतीय गोलंदाजांच्या दमदार कामगिरीने इंग्लंडचा डाव १३४ धावांवर आटोपला. यामुळे दिवसाअखेर भारताकडे एकूण २४९ धावांची आघाडी आहे.
आजचा दिवस सुरू झाल्यानंतर भारताचा संघ २८ धावा करून तंबूत परतला. पहिल्या दिवशी ३०१ धावा फटकारल्याने अखेर ३२९ धसंख्येवर सर्व गडी माघारी परतले. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या यजमान इग्लंडचा डाव अवघ्या १३४ धावंमध्ये आटोपला. आर अश्विनने पाच बळी घेत फिरकीची जादू दाखवली.
दुसऱ्या डावात भारताचा सलामीवीर शुबमन गिल (१४) लवकर बाद झाला. पण रोहित शर्मा (२५) आणि चेतेश्वर पुजारा (७) या दोघांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत फलंदाजी केली आणि भारताला २४९ धावांची आघाडी मिळवून दिली.