बांगलादेश महिला आशिया चषक २०२२सामना एक ऑक्टोबर रोजी थायलंडविरुद्ध होणार आहे. महिला चषक आशियातील हा आठवी सामना असणार आहे. सात ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने भिडणार आहे. महिला आशिया चषक २०१२ पासून टी२० प्रकारामध्ये खेळला जात आहे. यापूर्वी तो एकदिवसीय स्वरूपात खेळला जात होता.
२०२२ महिला आशिया चषकाचा पहिला उपांत्य सामना १३ ऑक्टोबर रोजी सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सकाळी ९.०० वाजता खेळवला जाईल. याच मैदानावर १३ ऑक्टोबर रोजी दुसरा उपांत्य फेरीचा सामनाही होणार आहे, परंतु वेळ दुपारी १.०० वाजता असेल. स्पर्धेचा अंतिम सामना १५ ऑक्टोबर रोजी सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दुपारी १.०० वाजता खेळवला जाईल. हे सामने महिला आशिया चषक २०२२ चे सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केले जातील. स्पर्धेच्या सामन्यांचे थेट स्टार स्पोर्ट्स, प्रवाह डिज्नी हॉटस्टार ऍपवर पाहायला मिळणार आहेत.
राउंड रॉबिन पद्धतीने या स्पर्धेत सात संघ आहेत. सर्व संघ ६-६ सामने खेळतील. यानंतर अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. चार संघांमध्ये दोन उपांत्य फेरी खेळल्या जातील आणि त्यानंतर १५ ऑक्टोबरला अंतिम सामना खेळवला जाईल. महिला आशिया चषक २०१२ पासून टी20 प्रकारामध्ये खेळला जात आहे.