नॉटिंगहॅममध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीचा आज पाचवा दिवस आहे. आजच्या सामन्यावर पावसाचे सावट आहे. दरम्यान भारताला विजयासाठी १५७ धावांची गरज आहे. पावसामुळे खेळपट्टीवर विकेट घेण्याचा फायदा इंग्लंडला असणार आहे. त्यामुळे भारताला विजय मिळवता येतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
भारत आणि इंग्लंड या संघात नॉटिंगहॅममध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीतचा आज पाचवा दिवस आहे. मात्र पाऊस पडत असल्यामुळे सामना सुरू होण्यास विलंब झाला आहे. चौथ्या दिवसअखेर भारताने १ बाद ५२ धावा केल्या असून त्यांना विजयासाठी अजून १५७ धावांची गरज आहे. पहिल्या डावात दमदार खेळी करणाऱ्या लोकेश राहुलला स्टुअर्ट ब्रॉडने तंबूचा मार्ग दाखवत इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर चौथ्या दिवसअखेर सलामीवीर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा प्रत्येकी १२ धावांवर नाबाद आहेत.