india may host olympics in 2036 
क्रीडा

ऑलिम्पिक 2036 चं यजमान पद भारताला मिळणार का?

2036 साली होणाऱ्या ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या यजमानपदासाठी भारताने उत्सुकता दर्शवली आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या भविष्यातील यजमान ठरविणाऱ्या आयोगाला इरादा पत्र (लेटर ऑफ इंटेन्ट) सादर करण्यात आले आहे.

Published by : Team Lokshahi

खेळाची पंढरी समजला जाणाऱ्या ऑलिम्पिकचे यजमानपद आपल्या देशाला मिळावं यासाठी प्रत्येक देश उत्सुक असतो. 2036 साली होणाऱ्या ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या यजमानपदासाठी भारताने उत्सुकता दर्शवली आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) भविष्यातील यजमान ठरविणाऱ्या आयोगाला इरादा पत्र (लेटर ऑफ इंटेन्ट) सादर करण्यात आले आहे. त्यामुळे आता आयओसीकडून भारताला ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी मान्यता मिळते का याकडे सगळ्याचं लक्ष वेधलं आहे.

भारतीय अधिकारी आणि 'आयओसी'मध्ये गेल्या काही महिन्यांपासून अनौपचारिक संवाद सुरू होता. अखेर भारताने यजमानपदाच्या दृष्टीने ठोस पाऊल उचलले आहे.भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) १ ऑक्टोबर रोजी 'आयओसी'ला पत्र पाठविल्याचे क्रीडामंत्रालयातील सूत्राकडून सांगण्यात आले. 'भारतासाठी ही खूप मोठी संधी ठरू शकेल. आर्थिक वाढ, सामाजिक प्रगती आणि देशभरातील युवकांचे सक्षमीकरण यासाठी ऑलिम्पिक यजमानपदाचा फायदा होऊ शकेल,' असेही सूत्राने नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2036 च्या ऑलिम्पिकचे आयोजन करण्याच्या त्यांच्या सरकारच्या आकांक्षेबद्दल सर्वप्रथम गेल्यावर्षी भाष्य केले होते. तसेच त्यांनी या वर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरील आपल्या भाषणात ऑलिम्पिक आयोजनाच्या इच्छेचा पुनरुच्चार केला होता. पुढील वर्षी आयओसीच्या निवडणुका होणार असून त्यानंतरच यजमानपदाबाबत निर्णय घेतला जाईल. भारताने ऑलिम्पिक आयोजनासाठी उत्सुकता दर्शवली असली, तरी सौदी अरेबिया, कतार आणि तुर्की या देशांचे आव्हान असणार आहे.

इरादा पत्र सादर केल्यामुळे, भारताने अनौपचारिक संवादापासून यजमान निवड प्रक्रियेच्या निरंतर संवाद टप्प्यापर्यंत प्रगती केली आहे. या टप्प्यात, आयओसीकडून संभाव्य यजमान देशांतील खेळांशी संबंधित प्रकल्पांच्या प्रगतीचा अभ्यास केला जातो. या प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात कोणत्या वर्षीच्या स्पर्धेचे यजमानपद भूषवायचे आहे, त्यासाठी औपचारिक बोली सादर करणे आवश्यक असेल. याचे मूल्यमापन आयओसीच्या भविष्यातील यजमान ठरविणाऱ्या आयोगाद्वारे केले जाईल.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी