बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पहिल्याच कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा दणक्यात पराभव केला आहे. पर्थमध्ये ऑप्टस स्टेडियमवर भारताने ऑस्ट्रेलियावर २९५ धावांसह ऐतिहासिक विजय पटकावला आहे. भारतीय संघानं पाच सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. यादरम्यान यशस्वी जैस्वालने केलेल्या 161 धावा आणि विराट कोहलीच्या शतकासह भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला विजयसाठी ५३३ धावांचे लक्ष्य दिले होते. पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 150 धावांवर सर्वबाद करून ऐतिहासिक पुनरागमन केले आहे.
भारताच्या विजयासाठी महत्त्वाची भूमिका बजावली
जसप्रीत बुमराह, यशस्वी जैस्वाल भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. भारतीय संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराहने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी जैस्वालने 161 धावा केल्या आणि त्याचसोबत भारताच्या गोलंदाजांनी आपल्या भेदक गोलंदाजीसह 150 धावांच्या आघाडीसह गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला मैदानावर टिकू न देता भारताच्या गोलंदाजांनी आपल्या गोलंदाजीसह कहर केला. भारतीय संघाचा कर्णधार आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाचे एकामागे एक 3 विकेट्स घेतले आणि सिराज, हर्षित राणाने यांच्या साथीसह ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचे धर की पळ केली.