नवी दिल्ली : भारतानं (India) दक्षिण आफ्रिकेविरुद्धची (South Africa) चौथी टी-20 (T-20) मॅच जिंकली. या विजयाबरोबर भारतानं सिरीजमध्ये 2-2 अशी बरोबरी साधली आहे. यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भारताचं 170 धावांचं आव्हान गाठताना दक्षिण आफ्रिकेचा डाव फक्त 87 धावांमध्ये गारद झाला.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत पहिली गोलंदाजी निवडली व भारताला फलंदाजी करण्यास निमंत्रण दिले. तर भारताची कामगिरी सुरुवातीलाच कोसळली. डावाच्या दुसऱ्याच षटकात ऋतुराज गायकवाडच्या रूपात भारताला पहिला धक्का बसला. कर्णधार ऋषभ पंत आणि उपकर्णधार हार्दिक पंड्याने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, कर्णधार पंत १७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
यानंतर फलंदाजीला आलेल्या दिनेश कार्तिकने पंड्यासोबत सामाधानकारक धावा केल्या. दोघांनी पाचव्या गड्यासाठी ६५ धावांची भागीदारी केली. कार्तिकने २७ चेंडूत ५५ धावा करत टी-20 मधील आपले पहिलेवहिले अर्धशतक पूर्ण केले. व भारताने 169 धावा करत दक्षिण आफ्रिकेला 170 धावांचं आव्हान दिले. 170 धावांचे आव्हान गाठताना दक्षिण आफ्रिकेचा डाव फक्त 87 धावांमध्ये गारद झाला. आवेश खाननं अवघ्या 18 धावांत 4 विकेट्स घेतल्या.
दरम्यान, पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने दोन आणि दक्षिण अफ्रिकेने दोन असे सामने जिंकले आहेत. यामुळे पाचवा सामाना आता अटीतटीचा होणार आहे. पाचवा सामना १९ जून रोजी बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे.