क्रीडा

IND vs PAK, World Cup 2023 : भारत-पाकिस्तान सामन्यावर सचिनची मराठीत प्रतिक्रिया म्हणाला...

टीम इंडिया-पाकिस्तान हे दोन्ही संघ आता वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये आमनेसामने येणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

टीम इंडिया-पाकिस्तान हे दोन्ही संघ आता वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये आमनेसामने येणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आज हा सामना आयोजित करण्यात आला आहे. वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघांनी आपले दोन्ही सामने जिंकले आहेत.

याच पार्श्वभूमीवर मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर अहमदाबादमध्ये दाखल झाला आहे. यावेळी माध्यमाशी बोलताना सचिन तेंडुलकर म्हणाला की, मी इथे टीमला सपोर्ट करायला आलो आहे, आशा आहे की, आपण सर्वांना हवा तोच निकाल लागो. असे म्हणत सचिन तेंडुलकरने मराठीतून प्रतिक्रिया दिली आहे.

भारतीय संघाची संभाव्य प्लेईंग 11 :

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन/शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

पाकिस्तान संघाची संभाव्य प्लेईंग 11 :

बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद शकील, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), सऊद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन अफ्रिदी, हारिस रौफ.

नागपूरमध्ये अन्न व औषध विभागाची मोठी कारवाई; भेसळयुक्त 688 किलो मिठाई जप्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांची एकाच दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांची एकाच दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा

वर्षावर मुख्यमंत्री शिंदेंची सरवणकरांसोबत 2 तास चर्चा; सरवणकरांना 4 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम

Diwali 2024: लक्ष्मी पूजनाला झेंडूची फुलं का वापरतात?