नवी दिल्ली : क्रिडा जगतातून क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी येत आहे. आता पुन्हा एकदा भारत विरुध्द पाकिस्तान (IND VS PAK) सामन्याचा थरार पाहायला मिळणार आहे. यावर्षी टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) भारत-पाकिस्तान संघ मैदानावर आमने-सामने येणार आहे. या सामन्याच्या तिकीट खरेदीसाठी एकच झुंबड झाली आहे.
या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. 16 ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून अंतिम लढत 13 नोव्हेंबर रोजी होणार आहे. अंतिम सामन्याची तिकिटेही जवळपास पूर्ण विकली गेल्याचे सांगण्यात येत आहे.
भारत-पाकिस्तान सामना यंदा दिवाळीच्या एक दिवस आधीच म्हणजे २३ ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर (MCG) होणार आहे. मात्र, याआधीच तीन महिन्यांपूर्वीच या सामन्याची जवळपास सर्व तिकिटे विकली गेली आहेत.
तर, याआधी भारत-पाकिस्तान हे दोन्ही संघ आणखी एक सामना खेळणार आहेत. हा सामना आशिया कप अंतर्गत खेळवला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, याचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही.
दरम्यान, मेलबर्नमधील हॉटेलच्या सर्व खोल्या आधीच रिझर्व्ह झाल्या आहेत. भारत-पाकिस्तान सामन्यासाठी मेलबर्नमध्ये 45 ते 50 हजार चाहते येण्याची शक्तता वर्तविण्यात येत आहेत.