IND Vs PAK Team Lokshahi
क्रीडा

IND VS PAK:भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबल्याआधी मोठा अडथळा

सामन्याच्या दिवशी पावसाची अधिक शक्यता, दहा ओव्हरचा खेळ होण्याची शक्यता

Published by : Sagar Pradhan

भारतीय क्रिकेट संघाने टी20 वर्ल्ड कप 2022 ची जोरदार तयारी सुरू केली आहे. टी20 वर्ल्ड कप 2022मध्ये भारतीय संघाचा पहिला सामना पाकिस्तानबरोबर होणार आहे. या सामन्याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. मात्र, आता हवामान खात्याने सामन्याच्या दिवशी पावसाची अधिक शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे ह्या सामन्यामध्ये पाऊस अडथळा करेल का? किंवा हा सामना रद्द होईल का? असा प्रश्न चाहत्यांना पडत आहे. आजपासून सलग तीन दिवस पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्याने जाहीर केली आहे.

जगभरातल्या चाहत्यांना भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याकडे लक्ष लागून आहे. त्यामुळे समजा पाऊस आला मॅच किती ओव्हर खेळवायची हा निर्णय आयसीसी बोर्ड घेणार आहे. विशेष म्हणजे मैदान मॅच खेळण्यासाठी तयार असेल तर तो निर्णय घेण्यात येणार आहे. अशा माहिती समोर आली आहे.

असे असतील दोन्ही संघ

भारतीय संघ

रोहित शर्मा (कप्तान), केएल राहुल (उप-कप्तान), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी

पाकिस्तान संघ

बाबर आजम (कप्तान), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, ​​शाहीन शाह आफरीदी, शान मसूद, फखर जमां.

मध्य रेल्वे मार्गावर तीन दिवस विशेष वाहतूक ब्लॉक

Latest Marathi News Updates live: संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू

हेल्दी आणि टेस्टी मुगाच्या लाडूची रेसिपी; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू; विविध विधेयकांवर होणार निर्णय

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड